वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) ने 2025 साठी विविध आरोग्य विभागातील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 110 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
VVCMC भरती 2025 – पदांची माहिती
पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
1 | बालरोग तज्ञ | 01 |
2 | साथरोग तज्ञ | 01 |
3 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 13 |
4 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 20 |
5 | वैद्यकीय अधिकारी | 37 |
6 | स्टाफ नर्स (स्त्री) | 08 |
7 | स्टाफ नर्स (पुरुष) | 01 |
8 | औषध निर्माता | 01 |
9 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
10 | बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 25 |
एकूण | 110 |
🔗 महत्त्वाचे दुवे
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
- पद क्रमांक 1 ते 5: संबंधित वैद्यकीय पदवी आणि अनुभव आवश्यक. वयोमर्यादा: 70 वर्षांपर्यंत.
- पद क्रमांक 6 ते 10: संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक. वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट)
📍 नोकरी ठिकाण
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र.
अर्ज शुल्क
सर्व प्रवर्गांसाठी अर्ज शुल्क नाही.
महत्त्वाच्या तारखा
- थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5): 28 मे ते 05 जून 2025
- अर्ज सादर करण्याची तारीख: 28 मे ते 05 जून 2025
अर्ज कसा करावा?
- पद क्रमांक 1 ते 5: मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे:
वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (पश्चिम).
पद क्रमांक 6 ते 10: अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा:
वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (पश्चिम).
ही भरती राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.